शिक्षकांना केलेल्या लाठीमाराचा निषेध
By admin | Published: October 7, 2016 11:50 PM2016-10-07T23:50:15+5:302016-10-08T00:03:13+5:30
कळवण : आर. के. एम.मधील शिक्षक संघटनेतर्फे निवेदन
कळवण : गेल्या अनेक वर्षांपासून योग्य व प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील विनाअनुदानित
कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान
द्यावे याविषयी लेखी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना औरंगाबाद येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा व शासनाचा कळवण येथील आर.के.एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक संघटनेने व विनाअनुदानित विभागाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला
आहे.
याविषयी लेखी निवेदन कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या एक महिन्यात अनुदान दिले नाही तर या शिक्षकांतर्फे बारावीच्या परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
औरंगाबाद येथे मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून
संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस आणि शिक्षकही जखमी झाले
आहेत. शिक्षकांनी आंदोलनावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी
केला याचा किशोर पगार यांनी निषेध नोंदवला असून, शासनाने याप्रश्नी दखल घ्यावी नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक नेते किशोर पगार यांनी यावेळी दिला.
यावेळी आर. बी. बोडके, एच. आर. गवळी, बी. एच. भारती, बा. सी. आहिरे, बी. एस. दिवटे, पी. एस. बिरारी, साखरे, एस. पी. बागुल, ए. एस. बच्छाव, यू. बी. कायस्थ, के. एस. पगार, उमेश कापडणीस, एस. पी. सोनवणे, पी. बी. नेरकर, नीता निकम, जी. डी. निरगुडे आदिंसह शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)