बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:22 AM2017-10-23T00:22:19+5:302017-10-23T00:22:24+5:30
कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.
नाशिक : कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकरी व वेगवेगळ्या शेतकरी संघटना आजही आग्रही आहोत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरातून बळीराजा मिरवणूक काढली. सुकाणू समितीने सरकारवर कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा आरोप केला असून, सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने शेतकºयांना सरकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात एक कोटी चार लाख शेतकरी आहेत. परंतु सरकारच्या जाचक अटींमुळे सुमारे ५८ लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्जच करू शकलेले नाही, तर अर्ज करणाºया अनेक शेतकºयांनाही या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे वगळले जाणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहे. या आत्महत्यांना सरकारचे शेती विरोधी घोरण जबाबदार असून, अशा शेती व शेतकरी विरोधी धोरणातील अंमलबजावणी करणाºया सरकारवर शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने बळीराजा मिरवणुकीच्या माध्यमातून केली असून, या मागण्यांचे निवेदनही पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सुकाणू समितीचे निवेदन स्वीकारले. सुकाणू समितीने काढलेल्या या बळीराजाची मिरवणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, किसानसभा आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील शेतकºयांनी सहभाग घेत आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.