अवयवदानाचा प्रसार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:57 AM2020-08-14T00:57:00+5:302020-08-14T00:57:33+5:30
अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला.
नाशिक : अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘अवयवदान - काल, आज आणि उद्या’ विषयावर गुरुवारी (दि. १३) आॅनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या चर्चासत्रात प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे, डॉ. भाऊसाहेब मोरे, मृत्युंजय आॅरगन फाउण्डेशनचे संचालक सुनील देशपांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण
गरजू रुग्णांसाठी अवयवदान हा आशेचा किरण असून, त्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. मोबाइल आणि इंटरनेटच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचे काम सोपे झाल्याचे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनी व्यक्त केले.