खरीप कांदा लागवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:28 AM2018-08-04T01:28:23+5:302018-08-04T01:28:49+5:30
नाशिक : महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टचा पहिला आठवड्यातच होते. परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडला असून, येत्या आठवडाभरात पावसाचे पुनरागमन झाल्यास जिल्ह्यात (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.
नाशिक : महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टचा पहिला आठवड्यातच होते. परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडला असून, येत्या आठवडाभरात पावसाचे पुनरागमन झाल्यास जिल्ह्यात (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात खरीप कांद्याच्या लागवडीसाठी सुमारे २,७४५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहितीच्या आधारे जिल्ह्यात सुमारे ७० हजार एकरवर खरीप कांद्याची लागवड शक्य आहे. परंतु मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे कांद्याच्या रोपवाटिका उशिरा तयार झाल्या असून, जुलैअखेरीस पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात शिघ्र खरिपाचा कालावधी उलटत आला असताना कांदालागवडीला वेग मिळालेला नाही. त्यामुळे नशिक जिल्ह्यात उशिराच्या (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदालागवड होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत केवळ १४२ हेक्टरवर कांदालागवड झालेली आहे. त्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शिघ्र खरिपात फार कांदालागवड होऊ शकलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यास लेट खरिपात कांदा लागवडीला वेग मिळण्याचे संकेत आहेत.
चांगला भाव मिळण्याची अपेक्षा
खरिपाच्या सुरुवातीला कांदा लागवड होऊ शकलेली नसल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर होणार आहे. बाजारपेठेत सध्या असलेला कांदानिर्यातीसाठी ५ टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जात असून, सरकारने निर्यातीवरील शुल्कही पूर्णपणे हटविले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात वाढून गेल्या हंगामातील उन्हाळ कांदा कमी होऊन लेट खरिपात उत्पादित होणाºया कांद्याला चांगले दर मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना लागलेली आहे.