प्रख्यात उर्दू शायर गुलाम अहमद जोया यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:20 AM2022-03-22T02:20:24+5:302022-03-22T02:20:47+5:30
शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथील पीरमोहना कबरस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे रात्री साडेदहा वाजता दफन करण्यात आले. जोया यांच्या निधनाने उर्दू साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील उर्दू शायरवर्गाने जोया यांच्या रूपाने एक दिग्गज असा शायरीमधील ''उस्ताद'' गमावला.
नाशिक : शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथील पीरमोहना कबरस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे रात्री साडेदहा वाजता दफन करण्यात आले. जोया यांच्या निधनाने उर्दू साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील उर्दू शायरवर्गाने जोया यांच्या रूपाने एक दिग्गज असा शायरीमधील ''उस्ताद'' गमावला.
नाशिक जे एकेकाळी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात असे. गोदाकाठी उर्दू शायरीचे बीजारोपणामध्ये जोया यांचा मोठा वाटा राहिला आहे. दिवंगत उर्दू शायर आदम मुल्ला आणि जोया यांची जोडीने उर्दू शायरीला शहरासह जिल्ह्यात वाढविले. त्यांनी मित्रांना समर्पित केलेले ''रेंगते लमहें'' आणि 1998साली प्रकाशित ''देर सवेर'' हे दोन्ही काव्यसंग्रह फार लोकप्रिय झाले.
जोया हे त्यांचे शयरीमधील नाव होते. त्याचा अर्थ ''शोधक'' असा होतो. वसंत पोतदार यांनी त्यांच्या रेंगते लमहें काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर ''सत्यशोधक कवी'' असा उल्लेख केलेला आढळतो. त्यांच्या शायरी चे वैशिष्ट्य म्हणजे सोपी सहज आणि सरळ भाषा. शहरासह जिल्ह्यात उर्दू शाहिरांची पिढी घडविणारे उस्ताद म्हणून गुलाम अहमद सोया परिचित होते. सार्वजनिक वाचनालायकडून 1998साली प्रभाकर वैद्य पुरस्कार तसेच 2005साली महापौर गौरव पुरस्काराने जोया यांना सन्मानित करण्यात आले होते. ते नॅशनल उर्दू शाळेचे व एच.पी.टी महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होत.
जोया यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शहरासह जिल्ह्यातील उर्दू शायर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.