महामोर्चाचा शहरातून दुचाकी रॅलीने प्रचार

By admin | Published: November 18, 2016 12:10 AM2016-11-18T00:10:27+5:302016-11-18T00:15:05+5:30

जुना मार्ग निश्चित : ईदगाह मैदानावर व्यासपीठाची उभारणी, तयारी पूर्णत्वास

Promoted by two-wheeler rally from the city of the mayor | महामोर्चाचा शहरातून दुचाकी रॅलीने प्रचार

महामोर्चाचा शहरातून दुचाकी रॅलीने प्रचार

Next

नाशिक : दलितांवरील अत्याचाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दलितांच्या संरक्षणार्थ अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, मराठा व मुस्लिमांना आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी अशा विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारी (दि.१९) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या प्रचारासाठी शहरातून दुचाकी रॅली गुरुवारी (दि.१७) काढण्यात आली.
दलित, ओबीसी, मुस्लीम समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी पाचशे स्वयंसेवक नियुक्त केले जाणार असून, विविध सामाजिक संघटनांनी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ व अल्पोहाराची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे. गुरुवारी रात्री अंबड लिंकरोडवरील म्हाडा वसाहतीमध्ये महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, ईदगाह मैदानापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून, या मैदानावर व्यासपीठ उभारणी करण्यात आली आहे.
राजीवनगर, सातपूर, गंजमाळ, पंचशीलनगर, भीमनगर, उपनगर, आंबेडकरनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, विहितगाव परिसरात निळे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी सजले आहे. शहर व परिसरात महामोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, गोल्फ क्लब मैदान येथून शनिवारी मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये बौद्ध, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्व जाती-धर्माच्या विविध संघटनांचा सहभाग असणार असल्याची माहिती नियोजन समितीने दिली आहे.
दुचाकी रॅलीला सकाळी राजीवनगर येथून सुरुवात झाली. रॅली कलानगर, इंदिरानगर, विनयनगर, वडाळानाका, सारडासर्कल, शालिमार, सीबीएस, त्र्यंंबकरोड, सातपूर, अंबड लिंकरोडवर पोहचली. रॅलीमध्ये युवक निळे फेटे बांधून सहभागी झाले होते. दुचाकींना झेंडे लावण्यात आले होते.

Web Title: Promoted by two-wheeler rally from the city of the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.