शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:18 AM2020-02-04T01:18:09+5:302020-02-04T01:19:39+5:30
नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

शेतकऱ्यांचे पूरक उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, पाढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील शेतकºयांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होेण्यासाठी सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे.
या योजनेंतर्गत सेंद्रिय गूळ प्रक्रिया उद्योग, फळे व भाजापाला सामुदायिक विपणन व्यवस्था, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, कांदा व मका ग्रेडिंग पॅकिंग व विपनन, भाजीपाला व बेदाणा सोलर निर्जलीकरण प्रकल्प, कांदा प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, आंबा व काजू फळ प्रक्रिया नागली, भात तृणधान्य प्रक्रिया आदी विविध प्रकल्प या गटांमार्फत सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गट उभारणी करताना येणाºया अडचणींबाबत आत्माच्या अधिकाºयांमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. येवला तालुक्यातील वसुंधरा कृषी सेंद्रिय भाजापाला, फळे, शेतमाल विक्री गट मानोरी या गटाने यात भरारी घेतली असून, या गटाने गतिमानतेने काम करण्यास सुरुवात केली आहे. अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरूजिल्ह्णाला १२ गटांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दोन वर्षांत एकूण १६ गटांची स्थापना करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये पाच तर २०१८-१९ मध्ये अकरा गटांची स्थापना करण्यात आली आहे. १६ गटांमध्ये एकूण ५२३ शेतकºयांचा समावेश आहे. या गटांना ६०:२०:२० याप्रमाणे अनुदान देण्यात येते. गटाच्या प्रकल्पाचा ६० टक्के भार शासन उचलते तर २० टक्के बॅँकेचे कर्ज आणि २० टक्के गटाचा स्वनिधी याप्रमाणे भांडवल उभारणी केली जाते. सन १७-१८ मध्ये गटांना ६३.८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. १८-१९ मधील गटांनाही अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.