प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By admin | Published: February 19, 2017 01:50 AM2017-02-19T01:50:01+5:302017-02-19T01:50:15+5:30
मंगळवारी होणार मतदान
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रविवारी (दि.१९) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, गुरुवारी, दि. २३ रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या प्रचाराची मुदत १९ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार असून, त्यानंतर दोन दिवस वैयक्तिक प्रचार व गुप्त भेटीगाठी सुरू होतील. मतदान केंद्रांवर कामकाज करण्यासाठी जवळपास १७ हजार २०० अधिकारी व कर्मचारी तसेच साडेआठशे वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत.
मंगळवारी मतदान होणार असून, त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. गुरुवारी दुपारपर्यंत सर्व ७३ गट व १४६ गणांचे निकाल जाहीर होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. (प्रतिनिधी)२५३ केंद्रे संवेदनशीलजिल्ह्यात एकूण २६५३ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान होणार आहे. या २६५३ पैकी जिल्ह्णात जवळपास २५३ मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील ठरविण्यात आली आहेत. या २५३ संवेदनशील केंद्रांवर व १५ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने एकत्र तपासणी करीत संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची निवड केली आहे.