जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:59 AM2019-03-06T00:59:05+5:302019-03-06T00:59:33+5:30

नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे, तर १०७९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली.

Promotions for employees in Zilla Parishad prize | जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी

Next
ठळक मुद्दे जिल्हा व तालुका स्तरावरून याबाबत पाठपुरावा

नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे, तर १०७९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागांतर्गत सेवाज्येष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या जिल्ह्णातील ११ वरिष्ठ सहायक (लिपिक) यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्ह्णातील तसेच मुख्यालयातील रिक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनाचे मूल्यमापन करण्यात येत असून, त्यानुसार आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील कामांचे आदेश जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अस्थापना विषयक सर्व बाबी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर भरण्यासाठी मानव संपदा प्रणाली वापरण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे सेवापुस्तक आॅनलाइन करण्यात आलेले आहेत.
यापूर्वी विविध आढाव्यासाठी गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांना जिल्हा परिषदेत बोलाविण्यात येत होते; मात्र डॉ. गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सचा प्रभावी वापर करून वेळ व खर्चातही बचत केली आहे. विविध योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, अपूर्ण असलेली कामे कधी पूर्ण करणार याबाबत संबंधितांकडून तारीख घेण्यात येत असून, त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावरून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

Web Title: Promotions for employees in Zilla Parishad prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.