निवडणुकीसाठी ओळखीचा पुरावा आवश्यक

By admin | Published: February 11, 2017 12:01 AM2017-02-11T00:01:06+5:302017-02-11T00:01:18+5:30

पर्याय : खात्री केल्यानंतरच मतदानाची मुभा

Proof of identity is necessary for elections | निवडणुकीसाठी ओळखीचा पुरावा आवश्यक

निवडणुकीसाठी ओळखीचा पुरावा आवश्यक

Next

 नाशिक : २१ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेल्या सर्वच मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा. परंतु, बोगस वा तोतया मतदारांकडून मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्र सक्तीचे केले असून, ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही, त्यांना अन्य पर्याय सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत प्रत्येक मतदाराचे छायाचित्र आहे. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदाराची ओळख पटविण्याचे काम मतदान केंद्राध्यक्षाचे असून, त्यासाठी त्यांनी अगोदर मतदारांना निवडणूक आयोगाने वितरीत केलेल्या मतदार कार्डाची मागणी करून त्याआधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न करावेत, असे आयोगाने म्हटले आहे, परंतु मतदाराकडे मतदारकार्ड नसेल तर तो मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अन्य १७ पुरावे पर्याय म्हणून आयोगाने निश्चित केले आहेत. त्यात प्रामुख्याने पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटो सहीत दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बॅँका अथवा पोस्ट आॅफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकराने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादींना फोटो सहीत दिलेले प्रमाणपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत (फोटोसहीत), राजय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्र परवाना तसेच रोजगार हमी योजनेखालील देण्यात आलेले फोटोसहीत ओळखपत्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पासबुक, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींचे फोटो असलेले ओळखपत्र, वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटासहीत कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी दिलेली शिधापत्रिका कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल, तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीचे नाव असल्यास त्याने स्वत:च्या वास्तवाचा अन्य पुरावा जसे वीज वापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती सोबत असणे बंधनकारक राहणार आहे.
या शिवाय आधारकार्डदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. उपरोक्त पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदाराने दाखविणे व त्याच्या आधारे मतदान केंद्राध्यक्षाने खात्री करूनच मतदाराला मतदानाची अनुमती द्यावी, असेही आयोगाने सूचना दिल्या आहेत.

Web Title: Proof of identity is necessary for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.