इच्छुकांना बरोबर घेऊन सर्वच पॅनलकडून प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:37 AM2018-11-21T01:37:39+5:302018-11-21T01:38:02+5:30
दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून माघारीपर्यंत पॅनलचे सर्व उमेदावर घोषीत होण्याची श्क्यता आहे. बॅँकेचे कार्यक्षेत्र हे बहूराज्यीय असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे नसल्याने किमान एकदा तरी मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी तयारी सुरू आहे.
सातपूर : दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून माघारीपर्यंत पॅनलचे सर्व उमेदावर घोषीत होण्याची श्क्यता आहे.
बॅँकेचे कार्यक्षेत्र हे बहूराज्यीय असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे नसल्याने किमान एकदा तरी मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी तयारी सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी (दि.१९) निवडणूक नामनिर्देशन पत्र वितरण आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ७४ इच्छुक उमेदवारांनी १७१ अर्ज घेतले ते दुसºया दिवशी ५६ इच्छुक उमेदवारांनी १४८ अर्ज घेतले आहेत. यात नम्रता पॅनलचे नेते अजित बागमार यांच्यासह प्रकाशचंद्र भुतडा, गणेश गिते, सुषमा पगारे, ललित मोदी, सुनील केदार, अॅड.विलास आंधळे, अविनाश अरिंगळे, नंदलाल पारख, मधुकर हिंगमिरे, सुमन पारख,भास्कर निकम, महेश पठाडे, परसराम वाघचौरे, सचिन सूर्यवंशी, हरिभाऊ लासुरे, गोरख चौधरी, शंकरराव बर्वे, अनिल नहार, सुरेश पाटील, आकाश छाजेड, प्रशांत दिवे, सोहनलाल भंडारी, राहुल दिवे, नरेंद्र पवार, विजय साने, अविनाश गोठी, ईश्वरलाल बोथरा, सुभाष नहार, भानुदास चौधरी, देवदत्त जोशी आदींचा समावेश आहे.
इच्छुकांची संख्या अधिक
सुमारे दोन लाख मतदार असलेल्या या बॅँकेच्या निवडणूकीत यंदा अभूतपूर्व चुरस दिसत आहे. नम्रता, प्रगती आणि सहकार या तीन पॅनलची निर्मिती सकृतदर्शनी झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असले तरी सर्वच पॅनलकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना डावलून जागांवर तडजोडी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणूका अटळ मानून तयारी सुरू आहे.