‘मतदार जागृती’साठी मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:15 AM2018-10-20T00:15:51+5:302018-10-20T00:16:40+5:30
मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.
नाशिक : मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. दर रविवारी निवडणूक शाखेच्या मदतीने विविध शाळांमध्ये नवीन नाव नोंदणी व दुरुस्ती मोहीम राबविली जात आहे. नाशिक मुस्लीम वेल्फेअर कमिटीचे सदस्य गेल्या आठवडाभरापासून विविध माहिती पत्रकांसह मतदार जनजागृतीचे बॅचेस लावून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांचे पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्र माची अंमलबजावणी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून केली जात आहे. नाशिक मुस्लीम वेल्फेअर कमिटीने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून, यात नायब शहर-ए-काझी सय्यद एजाज काझी यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी आसिफ इब्राहिम शेख, हाजी तौफिक, अयाज काझी, सोहेल काझी, असलम खान, इसहाक कुरेशी, माज खान, अॅड. आसिम शेख, आरिफ खान, अॅड. नाझमी काझी, आसिफ मुनिर, फारुक हुसेन, नदीम जैनुद्दीन शेख, नईम शेख, फारु क शेख, नासिर शेख, प्रा. राजू आदींचा समावेश आहे.
माहितीपत्रकांचे वाटप
‘आपले नाव मतदार यादीत आहेत का?, यादीत नावाची खात्री करा अन्यथा मतदानाच्या दिवशी निराश व्हाल’, असे घोषवाक्य असलेले बॅचेस व यादीत नाव कसे तपासायचे, यासंदर्भातील तब्बल पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करीत जुने नाशिक परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.