अक्षयपात्र योजनेचा प्रस्ताव अखेर महासभेत तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:23 AM2019-01-20T00:23:13+5:302019-01-20T00:25:20+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत अक्षयपात्र योजनेचा लाभ देत पूर्ण मध्यान्ह भोजन देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत तहकूब करण्यात आला आहे. ठाणे आणि अन्यत्र पाहणी करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. दरम्यान, महासभेतील या प्रस्तावाच्या विरोधात नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.
नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत अक्षयपात्र योजनेचा लाभ देत पूर्ण मध्यान्ह भोजन देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत तहकूब करण्यात आला आहे. ठाणे आणि अन्यत्र पाहणी करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. दरम्यान, महासभेतील या प्रस्तावाच्या विरोधात नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने शालेय पोषण आहारांतर्गत सध्या खिचडी देण्यात येते. परंतु देशात विविध ठिकाणी अक्षयपात्र योजनेअंतर्गत पूर्ण भोजन देण्यात येते. ठाणे येथे या स्वरूपाचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जात आहे. सर्व गटनेते, शिक्षण समिती सदस्य यांचा ठाणे येथे दौरा नेऊन योजनेची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतरच प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर भानसी यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने या प्रस्तावाला विरोध दाखवण्यासाठी निदर्शने केली. सेंट्रल किचन पद्धतीचा अनुभव चांगला नाही. अनेक ठिकाणी आहार वेळेवर पोहोचत नाही. मध्यान्ह भोजन पाठविण्यासच दहा ते बारा तासांचा विलंब लागत असल्याने उपयोग होत नाही, अशा अनेक प्रकारच्या त्रुटी यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे सेंट्रल किचनच्या नावाखाली आमचे रोजगार हिरावून घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यात कल्पना शिंदे तसेच सीटूच्या कार्यकर्त्यांबरोबरच कॉँग्रेस राष्टÑवादीच्या अनेक नगरसेविकाही सहभागी झाल्या होत्या, यात वत्सला खैरे, सुषमा पगारे, आशा तडवी, समीना मेमन यांचा सहभाग होता.