पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:34 PM2017-12-03T13:34:08+5:302017-12-03T14:45:15+5:30

Proposal for 'Central Park' at the place of Pelican Park | पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव

पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्देनिधीची मागणीसुमारे १५ कोटी खर्च अपेक्षित

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क ’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.
पेलिकन पार्कचे ठेकेदार पूना अ‍ॅम्युझमेंटने महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. परंतु, सदर निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले परंतु, तेथेही मनपाच्याच बाजूने कौल मिळाला. ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु, न्यायालयाने अपील दाखल करून घेताना कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे पेलिकन पार्कची जागा महापालिका विकसित करू शकते. त्यावर सलीम शेख यांनी सदर जागेत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणारा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. दरम्यान, पेलिकन पार्कच्या जागेचा तिढा सुटल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्याठिकाणी ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. तसा प्रस्ताव नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे दिलेला असून, निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सदर पार्कसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Proposal for 'Central Park' at the place of Pelican Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.