१९ जणांचा तडीपारीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:45 PM2017-08-24T23:45:22+5:302017-08-25T00:03:45+5:30
गणेशोत्सव व बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा. उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्यास सुरुवात केली आहे. कॅम्प हद्दीतील १९ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव येथील उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच सीआरपी ११० व १०७ अन्वये ८६ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेतले जात असल्याची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी दिली.
मालेगाव : गणेशोत्सव व बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा. उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्यास सुरुवात केली आहे.
कॅम्प हद्दीतील १९ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव येथील उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच सीआरपी ११० व १०७ अन्वये ८६ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेतले जात असल्याची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी दिली.
गणेशोत्सव व बकरी ईद काळात शहर शांततेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी कारवाया केल्या जात आहेत. कॅम्प पोलीस उपअधीक्षक हगवणे यांच्या कार्यक्षेत्रातील छावणी, किल्ला व कॅम्प पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यानुसार किल्ला-३, छावणी-६, कॅम्प-१० अशा १९ जणांना २५ आॅगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत हद्दपार करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. तसेच दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या १६ तर एक गुन्ह्याची नोंद असलेल्या ७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. आगामी उत्सव काळात कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाºयांवर कडक कारवाई केली जाईल असे कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.