चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:21 AM2019-05-09T00:21:30+5:302019-05-09T00:21:55+5:30

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, छावण्या चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने आता छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी पूर्ण केली आहे.

Proposal for fodder depot | चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव

चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देदुष्काळाची तीव्रता : प्रशासनाकडून पर्याय; छावण्या चालविण्यासाठी प्रतिसाद नाही

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, छावण्या चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने आता छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी पूर्ण केली आहे.
जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, बागलाण आदी दुष्काळी तालुक्यांत जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकत्याच केलेल्या दुष्काळी दौºयात ग्रामस्थांनी जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न उपस्थित केला, तर गावोगावी चाºयाअभावी जनावरांचे पालन करणे मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांनी त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोनवेळा निविदा मागविल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याउपरही प्रशासनाने बाजार समित्या व स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून त्यांना छावण्या सुरू करण्यासाठी गळ घातली. त्यावर दोन संस्थांनी तशी तयारी दर्शविली असली, जिल्ह्णातील अन्य तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी चारा छावण्यांऐवजी चारा डेपो शासनाने सुरू केले होते. परंतु यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात येऊन तसे गुन्हेही दाखल करण्यात आले होते ते टाळण्यासाठी शासनाने यंदा फक्त चारा छावणीच सुरू करण्याचा निर्णय घेऊन तसे आदेशही काढले आहेत. त्यामुळे चारा डेपो सुरू करण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणी पुढेही येत नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ते टाळण्यासाठी शासनाकडे सविस्तर वस्तुस्थिती विशद करून चारा छावण्याऐवजी चारा डेपो सुरू करण्यासाठी नाशिक जिल्ह्णाला अनुमती मिळावी, असा प्रस्ताव देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. तसे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सूतोवाच केले आहे. डेपोत फक्त चारा मिळेलचारा छावण्यांमध्ये शेतकºयांना त्याची पाच जनावरे घेऊन जाण्याची अनुमती आहे. या पाच जनावरांना दिवसा लागेल तितका चारा दिला जातो. तर चारा डेपोत शेतकºयाकडील जनावरांची संख्या लक्षात घेऊन शासनाने नमूद केलेल्या निर्णयानुसार चारा स्वस्त दरात विकत घेण्याची मुभा आहे.

Web Title: Proposal for fodder depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.