अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रस्तावाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:17 PM2019-09-09T18:17:58+5:302019-09-09T18:21:14+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे अध्यक्षांच्या दालनातच झालेल्या

Proposal order for construction of courtyard | अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रस्तावाचे आदेश

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रस्तावाचे आदेश

Next
ठळक मुद्देस्थायी समिती : जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार निधी४६५ अंगणवाड्यांना जागा आहे, मात्र बांधकामासाठी पैसे नही

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील बिगर आदिवासी तालुक्यातील अंगणवाड्यांची सद्यपरिस्थिती बिकट असून, अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार असल्याने संबंधित विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, खातेप्रमुखांनी जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलेली कामे तसेच मानसन्मान देऊन त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी तंबीही सांगळे यांनी दिली आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे अध्यक्षांच्या दालनातच झालेल्या या बैठकीत विषय समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना महिला व बाल कल्याण विभागाने अलीकडेच १६३ अंगणवाड्यांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यावर बिगर आदिवासी तालुक्यातील अंगणवाड्यांची दुरुस्ती व बांधकामासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर बिगर आदिवासी तालुक्यात ४६५ अंगणवाड्यांना जागा आहे, मात्र बांधकामासाठी पैसे नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यानुसार तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भास्कर गावित यांनी पेठ पंचायत समितीला गळती लागली असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना छत्री घेऊन कामकाज करावे लागत असल्याचे सांगितले. त्याबरोबर पावसाळ्यामुळे पेठ व परिसरात साथीच्या रोगांची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाहने बंद असल्याने कामकाज करताना अधिकारी, कर्मचा-यांना त्रास होत असल्याने वाहने दुरुस्तीची मागणी केली, तर किरण थोरे यांनी निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखित करण्याबाबत सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याबद्दल संताप व्यक्तकेला. या संदर्भात उप अभियंत्याला फोन केला असता, त्याने उत्तर दिले नाही. त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्याशी चर्चा करायला गेलो असता, त्यांनी ऐकून घेण्यास नकार दिल्याची तक्रार केली. अधिकारी जर असेच वागणार असतील तर आम्ही घरी बसतो, अधिका-यांनी त्यांच्या मनमर्जीनुसार कामे करावीत असे म्हणून धारेवर धरले. त्यावर अध्यक्ष सांगळे यांनी, सर्व खातेप्रमुखांनी यापुढे सदस्यांना सन्मान द्यावा व त्यांची कामे करावीत अशी तंबी दिली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी यापुढे खातेप्रमुखांकडून असे वर्तन होणार नसल्याचे सांगितले. सभेस बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, शिक्षण सभापती यतिन पगार, सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, आत्माराम कुंभार्डे, सुनीता पवार यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Proposal order for construction of courtyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.