सिंहस्थ संपल्यानंतर दोन कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव
By admin | Published: December 29, 2016 01:04 AM2016-12-29T01:04:12+5:302016-12-29T01:04:25+5:30
सिंहस्थ संपल्यानंतर दोन कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव
नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येऊ शकला नाही म्हणून आता कुंभमेळा संपल्याच्या एक वर्षानंतर दोन कोटी १४ लाख रुपयांच्या अॅनेस्थेशिया वर्क स्टेशनच्या खरेदीचा प्रस्ताव घाटत असून, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कुंभमेळ्यास लाखो साधू-महंत आणि भाविक येणार असल्याने २८ आॅगस्ट २०१२ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. परंतु आता कुंभमेळा संपल्यानंतर या वर्षी २२ मार्च आणि १२ एप्रिल तसेच १४ व २१ एप्रिल, २३ एप्रिल अशा निविदा मागविण्यात आल्या आणि त्यातील तांत्रिकता तपासल्यानंतर आता दोन कोटी १४ लाख रुपये खर्च करण्याची तयारी सुरू आहे. कारभारावर प्रश्नचिन्हएकीकडे महापालिका आॅनलाइन होत असून, त्या माध्यमातून गतिशील कारभाराची हमी भरली जात असताना दुसरीकडे मात्र कुंभमेळा संपल्यानंतर एक वर्षानी खरेदी करण्यात येत असल्याने पालिकेच्या गतिशील कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सिंहस्थात न वापरला गेलेला निधी अन्यत्र वापरण्यास मनाई केली असताना हा प्रकार घडला आहे.