२१ गावांचे टॅँकरसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:31 PM2020-05-17T21:31:07+5:302020-05-17T21:31:59+5:30

सुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Proposal for tanker of 21 villages | २१ गावांचे टॅँकरसाठी प्रस्ताव

भेनशेत येथे तळ गाठलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी झालेली महिलांची गर्दी.

Next
ठळक मुद्देसात टॅँकर मंजूर : तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरूच

श्याम खैरनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव पाणीटंचाई विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. पाच टॅँकर शासकीय तर दोन टॅँकर खासगी आहेत. मात्र यावेळी जुने व तकलादू टॅँकर न पाठवता नवे किंवा सुस्थितीतील टॅँकर पाठविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मोहनराव गांगुर्डे यांनी केली आहे. मागवण्यात आलेले पाणी टॅँकर सॅनेटाइझ केल्यानंतर या टॅँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना येत्या दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा केला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यात एकही संशयित रु ग्ण नसला तरीदेखील स्थानिक प्रशासन कोरोनासोबतच तालुक्यातील पाणीटंचाईवरदेखील लक्ष ठेवून आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त होताच सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. हे सर्व टॅँकर निर्जंतुक केले जाणार असून, टॅँकरवर स्थानिक चालक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यापुढे जसे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल.
- विजय सूर्यवंशी, तहसीलदार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सुरगाणा तालुक्यात दरवर्षी ठरावीक गावे व पाड्यांना पाणीटंचाईचा सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निर्माण झाली की टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव द्यायचा. मग टॅँकर मंजूर होऊन पाऊस पडेपर्यंत ईकडून तिकडून पाणी उपलब्ध करून या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करायचा, गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. काही महिलांनी तर हा प्रकार पिढ्यान् पिढ्या चालू असल्याचे सांगितले. निवडणुकांत अनेक नवे-जुने निवडून येतात, मात्र कुणाही प्रतिनिधिनीने पाणीटंचाई कायमची मिटवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हेवेदावे विसरून गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही पाणीटंचाई कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.

 

 

Web Title: Proposal for tanker of 21 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.