समृद्धी महामार्गप्रश्नी दुशिंगपूरच्या शेतकऱ्यांनी उपोषण थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:35 PM2020-06-07T21:35:12+5:302020-06-08T00:25:26+5:30
दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास केली. त्यानंतर समृद्धी महामार्गाशी संबंधित आपल्या विविध मागण्यांसाठी दुशिंगपूर बंधाºयात उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, कचरू कहांडळ यांची समजूत काढत आमदार कोकाटे यांनी त्यांचे उपोषण थांबवले.
सिन्नर : तालुक्यातील मोठा साठवण तलाव असणाºया दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास केली. त्यानंतर समृद्धी महामार्गाशी संबंधित आपल्या विविध मागण्यांसाठी दुशिंगपूर बंधाºयात उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, कचरू कहांडळ यांची समजूत काढत आमदार कोकाटे यांनी त्यांचे उपोषण थांबवले.
तहसीलदार राहुल कोताडे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, उपअभियंता बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाचे काम लॉकडाऊन काळात देखील सुरू आहे. समृद्धीच्या माध्यमातून दुशिंगपूर च्या तलावाचे खोलीकरण होणार असेल ते त्याचा दूरगामी फायदा होणार आहे. आज तलावात २० एमसीएफटी पाणी साठणे अवघड आहे. तलावात ६७ एमसीएफटी एवढे पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यासाठी देवनदी पूरचारी योजना फलदायी ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदे व कहांडळ यांच्या प्रश्नांवर लॉकडाऊन संपल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा घडवून आणली जाईल असे ते म्हणाले. कोकाटे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण थांबविले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, विजय काटे, विजय सोमाणी, कानिफनाथ काळे, संजय कहांडळ, अशोक घेगडलमल, विठ्ठलराव उगले आदी यावेळी उपस्थित होते.