समृद्धी प्रकल्पग्रस्थांना गावात मिळणार व्यवसाय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:14+5:302021-03-20T04:14:14+5:30
नाशिक : समृद्धी महामार्ग प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी कुटुंबातील एका व्यक्तीला व्यवसाय प्रशिक्षण देऊन कौशल्य आत्मसात करावे व स्वतःचा ...
नाशिक : समृद्धी महामार्ग प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी कुटुंबातील एका व्यक्तीला व्यवसाय प्रशिक्षण देऊन कौशल्य आत्मसात करावे व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे जनशिक्षण संस्था नाशिक यांच्यातर्फे समृद्धी प्रकल्पग्रस्तांना थेट त्यांच्या गावातच वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसाय प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.
मविप्रच्या सिन्नर औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी (दि. १८) समृद्धी महामार्ग प्रकल्पात जमीन गेलेल्या कुटुंबातील २० मुलांना वेल्डिग असिस्टंट कोर्सच्या प्रशिक्षणासाठी किट वाटप करण्यात आले. यावेळी ते यावेळी बोलत होते.
कौशल्य प्रशिक्षणासाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्ग प्रकल्पात जमीन गेलेल्या एकूण २६ गावांची यादी व इगतपुरी तालुक्यातील एकूण २३ गावांची यादी शिक्षण संस्थेला देण्यात आली असून हे प्रशिक्षण प्रत्यक्ष गावात जनशिक्षण संस्थेद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी गावाचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या मदतीने जागा उपलब्ध करून प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण २० जणांना वेल्डिग असिस्टंट कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना किट वाटपा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव व धामणगांव या ठिकाणी ४० प्रशिक्षणार्थ्यांना शिवणकामाचे किट वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
===Photopath===
190321\19nsk_24_19032021_13.jpg
===Caption===
व्यावसाय प्रशिक्षणानंतर आवश्यक साहित्याचे वितरण करताना उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनेवणे, किशोर भामरे, काशिनाथ मुळक आदी .