अल्पसंख्याकांना संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:55 PM2017-08-19T23:55:11+5:302017-08-20T00:18:33+5:30
नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.
नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे. आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वात इन्सानियत बचाव, लोकशाही बचाव संघर्ष समितीने मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढून देशभरातील अल्पसंख्याकांवर होणाºया हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाफिज जुनैद याची रेल्वेमध्ये हत्या झाल्याने अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मालेगाव येथील शहीद चौैकातून १५ आॅगस्ट रोजी काढलेली पदयात्रा सुमारे ११० कि लोमीटर अंतर चालून शनिवारी (दि.१९) नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पोहोचली. या भगवान आढाव, लतिफ बागवान, विठ्ठल बर्वे, अब्दुल कय्यम, शहजाद अख्तर, अब्दुल सिद्दीकी यांच्यासह नाशिकमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, पंडित येलमामे, दगडूशा कलाल, सरस्वती पाटील, सरस्वती मोरे, विमल अचावणे यांनीही सहभाग घेतला. तसेच काँगेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, बबलू खैरे यांच्यासह छात्रभारतीचे सागर निकम, समाधान बागुल, मंगेश साबळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लीम व दलित समुदायांवर हल्ले करून काही पक्ष व जातीयवादी संघटना एकधर्मी राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी संसदेत व विधिमंडळात कडक कायदा अस्तित्वात आणण्याच्या मागणीसह अशा संघटनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली. आंदोलकांचा ठिय्याच्मालेगाव येथून पदयात्रेने नाशिकपर्यंत आलेल्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा आग्रह केला. परंतु, जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून निवेदन स्वीकारून तिढा सोडवला.