सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षक किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:31 PM2020-04-07T22:31:36+5:302020-04-07T22:32:04+5:30
चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले.
चांदवड : चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष रेखा गवळी व उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, स्वच्छता व आरोग्य सभापती अल्ताफ तांबोळी, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, बांधकाम अभियंता कुरे, सोमनाथ देवकाते, नितीन फंगाळ, संजय गुरव, मुफिज शेख, संदीप महाले, जिशान खान, श्रावण कापसे, यशवंत बनकर, अशोक बनकर व नगर परिषदेचे सफाई कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषद प्रशासनाने सर्व प्रथम सोशल डिस्टन्सिंंगचा प्रयोग नाशिक जिल्ह्यात प्रथम केला आणि सर्व किराणा दुकाने, मेडिकल दुकाने यांच्यासमोर जागा आखून देत संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली. परिसरातील शेतकºयांच्या मदतीने टॅक्टरद्वारा संपूर्ण शहरभर सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. बेघर अथवा अडकलेल्या व्यक्तींसाठी निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या साहित्यांमध्ये एकूण १२ प्रकारचे साहित्य असून हेल्मेट, चष्मा, मास्क, लेदर शूज, कॉटन ड्रेस, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर आदींचा समावेश आहे. अशाप्रकारे संरक्षक साहित्य देऊन कर्मचाºयाची काळजी घेणारी चांदवड नगर परिषद ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी चांदवड नगरपालिका वेगाने व नियोजनबद्ध पावले उचलत आहे.