सेव्ह द चिल्ड्रनतर्फे ग्रामीण रुग्णालयास संरक्षक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:09 PM2020-06-24T16:09:19+5:302020-06-24T16:09:38+5:30

सिन्नर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोवीड-19 केअर सेंटर सुरु करण्यात आले मात्र सुविधांची वानवा , शासकीय निधीचा तुटवडा भासत असल्याने आमदार कोकाटे यांनी औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांनी सीएसआर फंडातून तसेच विविध सामाजिक संघटना, उद्योजकांनी मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर ह्णसेव्ह द चिल्ड्रनह्ण या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या कोवीड-199 केअर सेंटरला कर्मचाऱ्यांन संरक्षण साठी 4 हजार पीपीई किट, सॅनिटायझरच्या 200 मीलीच्या 300 बॉटल, 3 हजार एन-95 मास्क व ट्रीपल लेअर मास्कची भेट दिली.

Protective materials for rural hospitals by Save the Children | सेव्ह द चिल्ड्रनतर्फे ग्रामीण रुग्णालयास संरक्षक साहित्य

सेव्ह द चिल्ड्रनतर्फे ग्रामीण रुग्णालयास संरक्षक साहित्य

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांवर उपचार करणे आरोग्य विभागाला सोयीचे होणार आहे.

सिन्नर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोवीड-19 केअर सेंटर सुरु करण्यात आले मात्र सुविधांची वानवा , शासकीय निधीचा तुटवडा भासत असल्याने आमदार कोकाटे यांनी औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांनी सीएसआर फंडातून तसेच विविध सामाजिक संघटना, उद्योजकांनी मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर ह्णसेव्ह द चिल्ड्रनह्ण या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या कोवीड-199 केअर सेंटरला कर्मचाऱ्यांन संरक्षण साठी 4 हजार पीपीई किट, सॅनिटायझरच्या 200 मीलीच्या 300 बॉटल, 3 हजार एन-95 मास्क व ट्रीपल लेअर मास्कची भेट दिली.
प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य ग्रामीण रु ग्णालयाकडे सुपुर्द केले. कोवीड केअर सेंटरला मिळालेल्या संरक्षक साहित्यामुळे आरोग्य सेवकांचे संरक्षण होणार असून कोरोना रुग्णांवर उपचार करणे आरोग्य विभागाला सोयीचे होणार आहे.
याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी, डॉ लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, तालुका नोडल अधिकारी,डॉ लहू पाटील, अधीक्षक डॉ.निर्मला पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वाळवे, संस्थेचे पदाधिकारी धनंजय दिघे, योगेश पाटीले आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी- सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयास ह्णसेव्ह द चिल्ड्रनह्ण या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने आरोग्य कर्मचाºयांना संरक्षक साहित्य भेट दिले. त्याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. लता गायकवाड, डॉ. मोहन बच्छाव, डॉ लहू पाटील, डॉ. निर्मला पवार, धनंजय दिघे, योगेश पाटील आदि.

Web Title: Protective materials for rural hospitals by Save the Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.