विहिरीची संरक्षक रिंग खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:40 PM2019-11-13T23:40:27+5:302019-11-14T00:02:41+5:30

गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.

 The protective ring of the well was knocked out | विहिरीची संरक्षक रिंग खचली

विहिरीची संरक्षक रिंग खचली

Next

ब्राह्मणगाव : गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.
अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याच्या दबावामुळे येथील शेतकरी माजी सरपंच हेमंत अहिरे यांच्या शेतातील विहिरीच्या संरक्षक असलेल्या सीमेंटच्या रिंगा विहिरीत पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत तरी शेतकºयाला मदतीसाठी अद्याप कुठलीच शासकीय हालचाल नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हे संकट उभे असताना आता जमिनीतील पाण्याच्या दबावामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे विहिरींच्या संरक्षक रिंगांवर दबाव आल्याने विहिरीच्या सीमेंटच्या रिंग पाण्यात जात असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. वीज कंपनीच्या नवीन भारनियमनामुळेही शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Web Title:  The protective ring of the well was knocked out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.