खर्डे येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:02 PM2020-06-24T19:02:41+5:302020-06-24T19:03:17+5:30
खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.

खर्डे गावातील नवीन स्मशानभूमीत शासनाच्या आदिवाशी उपाय योजनेंतर्गत संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांसाठी साफसफाई करते वेळी पूर्वेकडील भिंत पाडली आहे.
याघटनेला वर्ष पूर्ण झाले असून, अद्याप या भिंतीची ग्रामपंचायतीने दुरु स्ती केली नाही. तसेच प्रवेशद्वाराचे गेटही नादुरु स्त असल्याने स्मशानभूमीत मोकाट कुत्रे, जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने दहन केलेल्या नागरिकांसाठीचा सुरिक्षततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन या भिंतीची तसेच गेटची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.