पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:05 IST2021-01-07T01:04:56+5:302021-01-07T01:05:26+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील शाळा व महाविद्यालयाला संरक्षण म्हणून बांधण्यात आलेली उंबरखेड रोड परिसरातील भिंत पडली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली
पिंपळगाव बसवंत : येथील शाळा व महाविद्यालयाला संरक्षण म्हणून बांधण्यात आलेली उंबरखेड रोड परिसरातील भिंत पडली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र पडलेल्या भिंतीकडून महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या भिंतीची दुरुस्ती करून परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
नऊ महिन्यांपासून कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र या बंद काळात महाविद्यालय परिसर टवाळखोरांचे आश्रयस्थान बनले. दरम्यान, या टवाळखोरांनीच संरक्षक भिंत पाडल्याची चर्चा होत असताना, महाविद्यालयाचे प्रशासन मात्र पाण्यामुळे भिंत पडली असल्याचा दावा करत आहे.