सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:47 AM2017-11-08T00:47:09+5:302017-11-08T00:47:29+5:30

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या ४९ सुरक्षारक्षकांना डिसेंबर २०१६ पासून वेतन नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही शिक्षण विभागामार्फत वेतन अदा करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सदर सुरक्षारक्षकांच्या वेतनासंबंधीची व सेवेत घेण्याविषयीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.

Protector deprived of salary | सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित

सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित

Next

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या ४९ सुरक्षारक्षकांना डिसेंबर २०१६ पासून वेतन नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही शिक्षण विभागामार्फत वेतन अदा करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सदर सुरक्षारक्षकांच्या वेतनासंबंधीची व सेवेत घेण्याविषयीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सन १९९८ पासून ५३ सुरक्षारक्षक सेवेत आहेत. संबंधित सुरक्षारक्षकांना मनपा सेवेत सामावून घेण्याबाबत कामगार न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई लढली गेली. न्यायालयाच्या निर्देशानुसार, सदर सुरक्षारक्षकांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना नियमित वेतन अदा करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. परंतु, डिसेंबर २०१६ पासून ४९ सुरक्षारक्षकांचे वेतनच अदा झालेले नाही. दरमहा वेतन व्हावे, यासाठी संबंधित सुरक्षारक्षकांकडून वारंवार महापालिकेत चकराही मारल्या जात आहेत. परंतु, वेगवेगळी कारणे देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याची तक्रार आहे. सेवेत घेण्याबाबतची फाइल विधी विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. परंतु, विधी विभागाने आपला अभिप्राय ५ जुलै २०१७ रोजी देऊनही वेतनाबाबतची कार्यवाही पुढे सरकली नाही. त्यामुळे, संबंधित सुरक्षारक्षकांची दिवाळीही वेतनाविनाच गेली. गेल्या अकरा महिन्यांपासून वेतन होत नसल्याने सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक परवड होत आहे. दरम्यान, आता आयुक्तांकडे सदर फाइल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे सुरक्षा रक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Protector deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.