शेतकरी संघटनेचा पाणी सोडण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:41 AM2018-10-21T00:41:25+5:302018-10-21T00:41:41+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

The protest against the abandonment of the farmer's association | शेतकरी संघटनेचा पाणी सोडण्याला विरोध

शेतकरी संघटनेचा पाणी सोडण्याला विरोध

Next

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी. नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा असून, तो पुरेसा आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, नांदगाव, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये आत्ताच टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. काही दिवसांत निफाड, नाशिक, दिंडोरी या तालुक्यांमध्येदेखील भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडणे योग्य होणार नाही. गंगापूर डाव्या कालव्यावर लाखो रुपये कर्ज काढून द्राक्ष, डाळींब व इतर फळबागा शेतकºयांनी उभ्या केल्या आहेत.
अत्यल्प पावसामुळे आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवत असून, रब्बीचे पहिले रोटेशन १५ डिसेंबरला सोडण्यात यावे, शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती लागू करावी, शेतीला बारा तास थ्री फेज लाइट द्यावी, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी अर्जुन बोराडे, रामनाथ ढिकले, भीमराव बोराडे, रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, सोपान कडलग आदी उपस्थित होते.

Web Title: The protest against the abandonment of the farmer's association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.