रस्त्यावर गोट्या खेळत बंदचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:18+5:302021-03-14T04:15:18+5:30

शहरातील बजरंग मार्केट भागातील व्यावसायिकांनी रस्त्यावर गोट्या खेळून बंदचा निषेध नोंदविला. येवला व्यापारी महासंघाने प्रांताधिकारी सोपान कासार यांना ...

Protest against bandh playing gota in the streets | रस्त्यावर गोट्या खेळत बंदचा निषेध

रस्त्यावर गोट्या खेळत बंदचा निषेध

Next

शहरातील बजरंग मार्केट भागातील व्यावसायिकांनी रस्त्यावर गोट्या खेळून बंदचा निषेध नोंदविला. येवला व्यापारी महासंघाने प्रांताधिकारी सोपान कासार यांना निवेदन देऊन, शनिवार, रविवार बाजारपेठ बंदी उठवावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार हॉटेल, खाद्यगृह आदींना शनिवारी, रविवारीही मर्यादित वेळेत चालू ठेवण्याची परवानगी असतांना शहरातील काही भागात नगरपालिका कर्मचारी यांनी हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्यास सांगितले. यावर हॉटेल व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतही पालिका अधिकाऱ्यांना दाखविली. मात्र, संबंधितांकडून हे आदेश आपणापर्यंत आले नसल्याचे सांगण्यात आले.

कोट

कोरोनामुळे सर्वच व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून आता कुठे थोडे स्थिरस्थावर होऊ लागले होते. त्यात पुन्हा बाजार बंदी लागू करण्यात आल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च अखेर सुरू असून कर्ज व देणी कशी द्यावी, हा व्यापारी वर्गापुढे मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे बाजार व बाजारपेठ बंदी उठवायला हवी. नियम व अटींचे पालन करत सर्वच व्यावसायिकांना व्यवसाय करू द्यावा.

- शिवाजी वाबळे, व्यावसायिक

Web Title: Protest against bandh playing gota in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.