केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:48+5:302021-08-22T04:17:48+5:30
येवला : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने येथील विंचूर चौफुलीजवळ केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा ...
येवला : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने येथील विंचूर चौफुलीजवळ केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली. सततची पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळींच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने विंचूर चौफुलीवर गॅस सिलिंडरला पुष्पहार घालत रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला.
या आंदोलनाने मनमाड-कोपरगाव व नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड भुर्दंड सोसावा लागत असून, महिलावर्गाचे स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जनता बेजार झाली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
या परिस्थिती केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या जनतेला आधार देण्याची गरज असतांना उलट सतत महागाई वाढत आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मनमानी केलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना देण्यात आले.
आंदोलनात येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजश्री पहिलवान, तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे, नर्गिस शेख, निता बिवाल, विमल शहा, निता बिवाल, सीमा बोडके, निर्मला थोरात, सुचिता थोरात, निगार सकट, मंगल शिंदे, सुमय्या शेख, पुष्पा खलसे, आशा सकट, बागूबाई मोहिन, मुमताज शेख, सोनाली शिंदे, मंगल शिंदे, मीरा खलसे, अनिता लोंढे, मोहिनी खैरनार, ताराबाई शिंदे, बिलकीस पठाण, हिना शेख, सुलोचना रिठे, वनिता कुचेकर, ज्योती रागपसरे, तानाबाई बोडके आदींचा सहभाग होता. (२१ येवला २)
210821\21nsk_38_21082021_13.jpg
रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी महिला आघाडीचेआंदोलन