मुंबईतील राजगृहाच्या तोडफोडीचा जिल्ह्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:58 PM2020-07-08T20:58:17+5:302020-07-09T00:29:54+5:30
मालेगाव : मुंबई येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मालेगाव : मुंबई येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा नेते बिपीन पटाईत, मुक्कीम मिनानगरी, किरण खरे, रवींद्र ढोडरे, विशाल खरे, अनिल जाधव, संतोष अहिरे, मनोज अहिरे, आकाश सुरवाडे, नितीन बिºहाडे, योगेश कापडणे, सिद्धार्थ शेजवळ, रूपेश पटाईत, रोशन अहिरे, अजय जोगदंडे, तुषार वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सिन्नर येथे क्रांतिगुरु सोशल फाउण्डेशनच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक राजू कांबळे, प्रदेशाध्यक्ष अंकुश सोळसे, प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके, युवा प्रदेशाध्यक्ष सचिन नेटारे यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला. निवेदनावर क्रांतिगुरुचे सिन्नर तालुकाध्यक्ष नंदूभाऊ दोडके, युवा तालुकाध्यक्ष योगेश जाधव, शहराध्यक्ष काळूराम देडे, अनिल साळवे, रवींद्र कांबळे, साईनाथ अस्वरे, गणेश अस्वरे, लखन दोडके आदींच्या सह्या आहेत. चांदवड येथे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना निवेदन दिले.
यावेळी राजाभाऊ अहिरे, आंनद बनकर, मंगेश केदारे, संजय जाधव, भूषण आढाव, शरद केदारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर देवीदास बनकर, संजय केदारे, रोशन निरभवणे, विकास जगताप, रोहित निरभवणे, रोहन जाधव, शेराज हिरे, विश्वास अहिरे आदींच्या सह्या आहेत.
आरोपींना कडक शासन करण्यात यावे या मागणीचे निवेदन नांदगाव येथे तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे शहर अध्यक्ष महावीर जाधव, रिपाइं महिला आघाडी शहर अध्यक्ष संगीता वाघ, गौतम काकळीज, दीपक मोरे, जाफर शेख, प्रवीण इघे, प्रशांत गरुड आदी उपस्थित होते.
-------------------
स्वारिप, भारिप : रिपाइंकडून निषेध
येवला : येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ व रिपाइंच्या वतीने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारिपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, रिपाइं युवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, स्वारिपचे महेंद्र पगारे, संजय पगारे, नगरसेवक अमजद शेख, हमजा मन्सुरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ब्लू पँथर सामाजिक संघटनेकडून तहसीलदार रोहिदास वारुळे यांना, संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनावर सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, सिद्धार्थ हिरे, संदीप लाठे, युवराज पगारे, गौतम लाठे, प्रवीण अहिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
------------
नांदगाव येथे दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे वाल्मीक जगताप व त्यांचे सहकारी यांनी निवेदन दिले. माजी नगरसेवक अरुण साळवे, भास्कर निकम, विलास कोतकर, अर्जुन पवार, हरिश्चंद्र बागुल, नाना जगताप, योगेश अहिरे, प्रवीण गरु ड, आकाश साळवे, सुकदेव कोतकर, मनमोहन काळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.