हाथरस घटनेचा येवल्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:47 IST2020-10-02T21:58:45+5:302020-10-03T00:47:38+5:30
येवला : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फत्तेबुरूज नाक्यावर मोदी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

येवला येथे हाथरस घटनेचा निषेध करताना राष्टÑवादी कॉँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
येवला : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फत्तेबुरूज नाक्यावर मोदी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष गोटू मांजरे यांनी यावेळी बोलतांना मोदी व योगी सरकारवर जोरदार टीका केली. या आंदोलनात प्रल्हाद जगताप, संतोष राउळ, दीपक गुंजाळ, सुभाष जगताप, सिद्धार्थ त्रिभुवन, सिद्धार्थ हिरे, गौतम लाठे, दत्तात्रेय कोटमे, मिलिंद पगारे, आकाश भालेराव, युवराज पगारे, मिलिंद गांगुर्डे, शुभम गायकवाड, संदीप जोंधळे, अक्षय शिंदे, नईमभाई शेख, कादिरभाई शेख, सुरेश मांजरे, सीताबाई गांगुर्डे, ज्योती गांगुर्डे, शशिकला त्रिभुवन, हिराबाई जाधव, अलका सपकाळ, बबलू मांजरे, राहुल मांजरे आदी सहभागी झाले होते.