Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:41 IST2018-12-10T13:20:20+5:302018-12-10T13:41:19+5:30
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले.

Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे
मनमाड (नाशिक) : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले. रिपाई शहर शाखेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे शहराच्या प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.
आठवले यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, शहर अध्यक्ष दिलीप नरवडे, पी आर निळे यांच्या नेतृत्वाखाली सदर चे आंदोलन करण्यात आले. आठवले यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली.