राजगृह हल्लाप्रकरणी भीमसैनिकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:23 PM2020-07-09T20:23:32+5:302020-07-10T00:24:47+5:30
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूना तात्काळ अटक करावी या आशयाचे निवेदन मनमाड येथील भीमसैनिकांकडून पोलीस निरीक्षक , जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना देण्यात आले.
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूना तात्काळ अटक करावी या आशयाचे निवेदन मनमाड येथील भीमसैनिकांकडून पोलीस निरीक्षक , जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना देण्यात आले.
याबाबत शासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.यावेळी प्रविण पगारे, रवि निकम,कैलास गायकवाड,वैशाली पगारे, अमोल लंकेश्र्वर,उमेश भालेराव ,विशाल बाच्छाव,किरण पगारे, प्रितम गायकवाड, अकाश वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुरूकुमार निकाळे, विशाल पाटील, मनीष चाबुकस्वार,काकासाहेब खरे, मिलिंद शेळके, अमोल लंकेश्वर, आनंद अंकुश, गणेश गरु ड आदींनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
----------------------------
वंचित बहुजन आघाडीकडून निषेध
देवगाव : मुंबई येथील राजगृह निवासस्थानाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करत तहसीदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काशीद, तालुका अध्यक्ष मधुकर कडलग, तानाजी गांगुर्डे, संजय ताठे, समाधान गांगुर्डे, संजय भागवत आदी उपस्थित होते.
--------------
नांदगाव येथे दलित व बहुजनांचे श्रद्धास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या आवारात तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने शहर अध्यक्ष महावीर जाधव व सहकाºयांनी दिले. याप्रसंगी आरपीआय महिला आघाडी शहर अध्यक्ष संगीता वाघ, गौतम काकळीज, दीपक मोरे, जाफर शेख, प्रवीण इघे, प्रशांत गरुड उपस्थित होते.