निफाडला निवडणुका जाहीर करण्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:41+5:302021-09-16T04:20:41+5:30
निफाड : राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका जाहीर करण्याच्या ...
निफाड : राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका
जाहीर करण्याच्या निर्णयाचा निफाड तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने बुधवारी निषेध करण्यात आला व निवेदन नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका जाहीर झाल्या. सरकारच्या या निवडणुका घेण्याच्या निर्णयाचा निफाड तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आम्ही निषेध व्यक्त करतो व जोपर्यंत राज्यात ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतांना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजुश्री थोरात, पंढरीनाथ पीठे, शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन धारराव, सितल बुरकुले, रमेश आहेर, कैलास शिंदे, रामदास मुरकुटे, ज्ञानेश्वर इकडे, तानाजी पडोळ, माधव आहेर, केशव सुरवाडे, दिनकर कुयटे, गोविंद कुशारे, गौरव वाघ, भगवान कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देतांना शंकर वाघ. समवेत भागवत बाबा बोरस्ते, संजय शेवाळे, मंजुश्री थोरात, पंढरीनाथ पीठे, सचिन धारराव, रमेश आहेर, कैलास शिंदे,केशव सुरवाडे, दिनकर कुयटे आदींसह कार्यकर्ते. (१५ निफाड ओबीसी)
150921\15nsk_62_15092021_13.jpg
१५ निफाड ओबीसी