वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:06 PM2020-01-15T23:06:22+5:302020-01-16T00:32:31+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या आक्षेपार्ह पुस्तकाच्या निषेधार्थ मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. शिवरायांचा अवमान करणाºया या लेखकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मनमाड : छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या आक्षेपार्ह पुस्तकाच्या निषेधार्थ मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. शिवरायांचा अवमान करणाºया या लेखकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून सर्वत्र वाद निर्माण झाला असताना त्याचे पडसाद मनमाड शहरात उमटले. नरेंद्र मोदींच्या कार्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केल्याने शिवरायांचा अवमान झाल्याचा आरोप करत मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढला. शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. एकात्मता चौकात या मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. यावेळी अफजल शेख, रहेमान शहा, फकीरराव शिवदे, बाळासाहेब साळुंके, संतोष अहिरे, मिलिंद उबाळे, संजय निकम, अशोक व्यवहारे, सुनील गवांदे, भीमराव जेजुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाचा निषेध
केंद्र सरकारचा निषेध करणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन घोषणाबाजी केली. तसेच सीएए व एनआरसी हे घटनाबाह्य विधेयक आणून देशाची घटना बदलण्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला.