मालेगावी इस्रायली वस्तूंचे दहन करून निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:08 PM2021-05-22T17:08:02+5:302021-05-22T17:08:23+5:30
मालेगाव : इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारताने हस्तक्षेप करून पॅलेस्टाईनला मदत करावी व इस्राईल कडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इस्राईल वस्तूंच्या वस्तूंचे दहन करून वस्तूवर बंदी आणावी या मागणीसाठी येथील जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी किदवाई रोडवरील पेरी चौकात आंदोलन केले.
मालेगाव : इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारताने हस्तक्षेप करून पॅलेस्टाईनला मदत करावी व इस्राईल कडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इस्राईल वस्तूंच्या वस्तूंचे दहन करून वस्तूवर बंदी आणावी या मागणीसाठी येथील जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी किदवाई रोडवरील पेरी चौकात आंदोलन केले. गेल्या रमजान महिन्यापासून इस्रायल व पॅलेस्टाईन संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. भारताने नेहमीच पॅलेस्टाईनला मदत केली आहे. इस्राईल हा पलेस्टाईनचा भाग मान्य करून स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आहे. इस्राईलच्या हल्ल्यात २१३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या प्रकरणाचा येथील जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. इस्राईल विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इस्राईली वस्तूंचे दहन केले. त्यांच्या वस्तू याच्यापुढे वापरायच्या नाहीत असा निर्धार व्यक्त करत इस्राईलच्या भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनात मुस्तकींम डिग्निटी ,मुस्लिम धांडे ,रिजवान खान ,अब्दुल बाकी , अहमद शेख, फिरोज खान ,शफीक अहमद, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.