तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:48 PM2018-06-27T22:48:54+5:302018-06-27T22:49:41+5:30

मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

The protest movement of the MLAs in the Tehsil office | तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन

तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देमालेगाव : शैक्षणिक दाखले देण्यास विलंब

मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.
सध्या विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. शहर व तालुक्यातील विद्यार्थी व पालकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले व इतर शैक्षणिक दाखल्यांची गरज असते. येथील सेतू व तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी अर्ज करूनही विद्यार्थी व पालकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. दोन हजार ३०० उत्पन्नाचे दाखले प्रलंबित असल्याची तक्रार काही पालकांनी आमदार शेख यांच्याकडे केली होती.
विद्यार्थी व पालकांना वेळेवर शैक्षणिक दाखले देण्याच्या सूचना आमदार शेख यांनी केल्या.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार शेख यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालय गाठले. वेळेवर दाखले का दिले जात नाही, असा जाब तहसीलदार ज्योती देवरे यांना विचारीत कार्यालयाच्या वºहांड्यात ठिय्या आंदोलन केले.

Web Title: The protest movement of the MLAs in the Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.