मराठा समाजाचे राज्य शासनाविरोधात कसाऱ्यात निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 01:08 PM2023-09-03T13:08:02+5:302023-09-03T13:11:31+5:30
सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले.
शाम धुमाळ, कसारा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून राज्यशासनाचा निषेध करण्यासाठी कसारा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आज रविवारी (ता.3) निषेध मोर्चा काढण्यात आला.
आज सकाळी सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले.रविवारी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली. मराठा समाजाच्या महिलाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या.
सकाळी 10 वाजता निघालेल्या या निषेध मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे रघुनाथ कदम,विजय शिंदे,शिवाजी भोसले, माधुरी आयरे,सुधीर चौधरी, अमोल बांदेकर,शंकर भगत,महेंद्र शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात . मराठा आंदोलकांवर केलेल्या हल्याचा निषेध करून यापुढे अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही जर राज्य सरकार मराठा समाजा बाबत एवढे निष्ठूर वागत असेल तर या पुढे शांततेत होत असलेले आंदोलन वेगळ्या पद्धतीने होतील असा इशारा या वेळी मराठा समाजाच्या स्थानिक नेत्यांनी राज्यशासनास दिला दरम्यान पोलीस हे मराठा समाजाचे शत्रू नाहीत परंतु ज्यावेळी राज्य शासनाचा प्रतिनिधी पोलिसांना लाढीचार्ज ,गोळीबार चे आदेश देतो त्याच वेळी पोलीस अशी भूमिका घेतात त्यामुळे आमचा लढा हा पोलिसा विरोधात नाही तर शासना विरोधात असल्याचे यावेळी मोर्चेकरांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट थांबवा...
दरम्यान जालना मधील पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज दरम्यान चेंगरा चेंगरीत व पोलिसाच्या मारहाणीत अनेक मराठा बांधव गभीर जखमी झाले व पोलीस देखील जखमी झालेत पण पोलीसावर आंदोलकांनी पलटवार केलेला नाही या चेंगराचेंगरीत ते जखमी झालेत परंतु काही समज कंटक जखमी पोलिसांचे फोटो व्हायरल करून मराठा समाजात व पोलिसांत वाद निर्मान् करू पाहत आहेत ते निदनीय आहे समज कंटकांनी मराठा समाजाची बदनामी करणे अन्यथा अन्यथा त्याचेही पडसाद उमटतील असा इशारा मराठा समाजाचे कसारा चे पदाधिकारी रघुनाथ कदम यांनी दिला.