नाशिकमध्ये विरोधी पक्षांचे गोदापात्रात उतरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:21 PM2018-10-24T15:21:10+5:302018-10-24T15:25:30+5:30
नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवत पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी बुधवारी (दि.२४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.

यावेळी सर्वपक्षीयांनी गोदावरीची महाआरती केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी घेतला सदरचा निर्णय घेताना नाशिकच्या नागरिकांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याचा अंदाज घेतलेला नाही तसेच नाशिकच्या जनतेसाठी धरणातून पाणी आरिक्षत केलेले नाही. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याने सत्ताधारी वगळता सर्विपक्षयांनी एकत्र येत पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
बुधवारी दुपारी मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामकुंडावर एकत्र येत पाण्यात उतरून गोदावरीची आरती करून हातात फलक घेत शासनाचा व सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविला. यावेळी धरण उपाशी कोरड घशाशी, पाणी नाही कुणाच्या बापाचे ते तर आमच्या हक्काचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर,मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनपा विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे, मनपातील गटनेता विलास शिंदे,माकपाचे कॉ. श्रीधर देशपांडे, नगरसेवक गजानन शेलार, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे,राजेंद्र बागूल, पुनम मोगरे, वैशाली भोसले, दिगंबर मोगरे, प्रवीण भाटे, खंडू बोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.