नाशकात मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:20 PM2018-07-28T13:20:48+5:302018-07-28T13:22:39+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी नाशिक जिलह्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात नाशिकमध्ये आतापर्यंत रस्तारोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे विविध प्रकारची आंदोलने शांततापूर्ण मार्गाने यशस्वी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आता सरकारविरोधातील आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या घरांवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 The protest movement at the residence of the MLAs of Maratha Kranti Morcha in Nashik. | नाशकात मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन

नाशकात मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाच आरक्षणासाठी आंदोलन सुरूच नाशकात भाजपा आमदाराच्या घरासमोर आंदोलनबाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी नाशिक जिलह्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात नाशिकमध्ये आतापर्यंत रस्तारोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे विविध प्रकारची आंदोलने शांततापूर्ण मार्गाने यशस्वी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आता सरकारविरोधातील आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या घरांवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या आंदोलनाची सुरुवात राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी असलेल्या संपर्क कार्यालयासमोर शनिवारी (दि. 28) ठिय्या आंदोलन करून करण्यात आली आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थानाबाहेर असेच आंदोलन करण्यायत येणार असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठोक आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देत पदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांना यातून वगळण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवस्थानी बोंबाबोंब करून ठिय्या आंदोलन करण्यात आल. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय तसेच आरक्षण आम्हच्या हक्कचं नाही कोणाच्या बापाचं,बात तो आपको करणी होगी, करणी होगी, फडवणीस सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी करण गायकर, तुषार जगताप, योगेश निसाळ, संदीप लभडे, शरद तुंगार, मदन गाडे,उमेश शिंदे,संतोष मालोडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, प्रियदर्शनी काकडे, मंगला शिंदे,मनोज सहाणे, किरण पाणकर, अमोल वाजे, अप्पा गाडे, ज्ञानेश्वर जाधव,विलास काहनमाले, सुरज सोलंकी आदी उपस्थित होते.

 

Web Title:  The protest movement at the residence of the MLAs of Maratha Kranti Morcha in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.