जिल्ह्यात मूकमोर्चा काढून निषेध

By admin | Published: July 21, 2016 12:05 AM2016-07-21T00:05:23+5:302016-07-21T00:06:59+5:30

कोपर्डी घटनेचे पडसाद : दोषींवर कठोर करावाईची मागणी

Protest prohibition of silence in the district | जिल्ह्यात मूकमोर्चा काढून निषेध

जिल्ह्यात मूकमोर्चा काढून निषेध

Next

देवळा : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्त्या केल्याच्या निषेधार्थ बुधवारी देवळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, गुरुवारी वणी येथे घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार आहे.
देवळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी व शहरवासीयांनी मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. नगरपंचायतीच्या प्रांगणात मोर्चानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम आदिंनी मनोगत व्यक्तकरून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. यावेळी समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, नूतन आहेर, मुन्ना आहिरराव, जगदीश पवार, संभाजी अहेर, उपनगराध्यक्ष अशोक अहेर, नगरसेवक अतुल पवार, दिलीप आहेर, लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुधाकर पवार, जितेंद्र अहेर, पवार, कौतिक पवार, चंद्रकांत अहेर आदि उपस्थित होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश माने यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिक आदिंसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून १०० टक्के बंद यशस्वी केला. निषेध मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Protest prohibition of silence in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.