काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:22 AM2018-11-25T00:22:58+5:302018-11-25T00:24:53+5:30
हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) बडी दर्गा येथे निषेध नोंदविण्यात आला.
नाशिक : हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) बडी दर्गा येथे निषेध नोंदविण्यात आला.
शुक्रवारच्या नमाजपठणानंतर बडी दर्गाच्या प्रांगणात मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन काबूलमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचे फलक झळकाविले. यावेळी अफगाणिस्तान सरकारकडे या हल्ल्याच्या सखोल चौकशीच्या मागणीचे फलकही पहावयास मिळाले. काही नागरिकांनी हातात काळे झेंडे घेऊन यावेळी निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला. अमेरिका व इस्त्रायलच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला गेला. अफू, गांजा सारख्या अंमली पदार्थांच्या उत्पादन व विक्रीला होणाऱ्या विरोधातून तालिबानी संघटनांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यावेळी ‘दहशतवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, एजाज काझी, मुख्तार शेख, हाजी शोएब मेमन, इर्शाद पिरजादा अन्सार पाटकरी यांच्यासह उपस्थित होते.
हेतुपुरस्सर पैगंबरांच्या अुनयायांवर अन्याय, अत्याचार तालिबानी विचारधारेतून केला जात असल्याचे यावेळी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा यांनी सांगितले. संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा व समतेचा संदेश देणाºया पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मशिदीत होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात माणुसकीला काळिमा फासणारा झालेला हल्ला हा निंदणीय असल्याचे ते म्हणाले.