नाशिकच्या शिवतिर्थावरून मुंबईला आंदोलनास जाणार; मराठा समाजाचा निर्णय

By Suyog.joshi | Published: December 30, 2023 04:40 PM2023-12-30T16:40:00+5:302023-12-30T16:42:40+5:30

दोन जानेवारीस पुन्हा बैठकीचे आयोजन.

protest will go to mumbai from shivtirtha of nashik says maratha protestor | नाशिकच्या शिवतिर्थावरून मुंबईला आंदोलनास जाणार; मराठा समाजाचा निर्णय

नाशिकच्या शिवतिर्थावरून मुंबईला आंदोलनास जाणार; मराठा समाजाचा निर्णय

नाशिक (सुयोग जोशी) : मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठरेल त्या दिवशी नाशिकच्या शिवतीर्थावरून मुंबईत गाड्यांसह सर्व लवाजमा घेवून प्रस्थान करणार असल्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारच्या (दि.३०) बैठकीत घेण्यात आला. येत्या २ जानेवारीला पुन्हा नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात राजकीय लोकप्रतिनिधी,संघटना,संस्था,उद्योजक,डॉक्टर इंजिनियर,शिक्षक व सर्वांची एकत्रित बैठक होईल. जिल्ह्यातील, विविध तालुक्यात मराठा समाजाच्या तालुका वार बैठका व सभा घेण्याबाबत नियोजन या बैठकीत जाहीर करण्यात आले.

नाशिकच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व सहभागासाठी सर्व राजकीय, सामाजिक मंडळींची बैठक यावेळी झाली. या बैठकीत उपस्थित मंडळींनी मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या नियोजनात योगदान विषयावर मांडणी केली. यावेळी माजी आमदार अनिल आहेर यांनी नांदगाव, मालेगाव भागातील आम्ही मराठा आंदोलनात सक्रिय राहू मिळेल ते सहाय्य करू असे सांगितले. 

दत्ता गायकवाड यांनी सर्व शक्तीनिशी आपण आंदोलनात सहभागी होऊ. पाणी, जेवण, प्रवास अशा सेवा देवू असे सांगितले. शिवाजी सहाणे यांनी यावेळी दोन ठराव मांडले. माजी आमदार संजय चव्हाण,करण गायकर, वत्सला खैरे,शाहू खैरे,विलास शिंदे,प्रफुल्ल वाघ यांनी ही मराठा आंदोलनात सहभाग व सेवा देवू असे सांगितले. यावेळी नाना बच्छाव, बंटी भागवत,चंद्रकांत बनकर, नितीन रोटे पाटील,संदीप मेढे,योगेश नाटकर,विकी गायधनी,प्रफुल वाघ,यासह डॉ रुपेश नाठे, निलेश ठूबे,हिरामण वाघ,कैलास खांड बहाले,माजी सैनिक बाळासाहेब गाडे,पंढरीनाथ कापसे उपस्थित होते. प्रास्ताविक सूत्रसंचालन नितीन डांगे पाटील यांनी केले. आभार राम खुर्दळ यांनी मानले.

Web Title: protest will go to mumbai from shivtirtha of nashik says maratha protestor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.