गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By संजय पाठक | Published: August 21, 2023 05:55 PM2023-08-21T17:55:11+5:302023-08-21T18:22:48+5:30
केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
संजय पाठक
नाशिक- केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के केल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये स्वराज्य पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांनी आपल्या गळयात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी जलज शर्मा निवेदन दिले.
केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतीचं अर्थशास्त्र बिकट बनले आहे काही महिन्यांपूर्वी कांद्याला भाव मिळत नसल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क केल्यामुळे ही एक प्रकारची अघोषित बंदीच असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे. दरम्यान निर्यात शुल्कवाढीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर, केशव गोसावी, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.