...आंदोलनकर्ते अन् बंदोबस्तावरील पोलिसांना टोर्इंगचा दणका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:24 AM2018-06-02T00:24:28+5:302018-06-02T00:24:28+5:30
वेळ-दुपारी बारा वाजेची... स्थळ : रामकुंडावरील कपालेश्वर पोलीस चौकी़़ग़ंगाघाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी़़़ आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक व त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच नागरिकांची दुचाकी वाहने टोर्इंग वाहनाद्वारे शहर वाहतूक शाखेने उचलून नेल्याने शुक्रवारी (दि़१) सकाळी मोठा गोंधळ उडाला.
पंचवटी : वेळ-दुपारी बारा वाजेची... स्थळ : रामकुंडावरील कपालेश्वर पोलीस चौकी़़ग़ंगाघाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी़़़ आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक व त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच नागरिकांची दुचाकी वाहने टोर्इंग वाहनाद्वारे शहर वाहतूक शाखेने उचलून नेल्याने शुक्रवारी (दि़१) सकाळी मोठा गोंधळ उडाला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांसह नागरिकांनी थेट वाहतूक शाखेच्या नवीन आडगाव नाक्यावरील कार्यालयात धाव घेऊन वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांवर चांगलेच तोंडसुख घेतले. वाहनधारकांनी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवून वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडून वाहने उचलून दंडात्मक कारवाई केली जात असली तरी शुक्रवारी (दि.१)वाहन उचलेगिरी करणाºया व ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी व टोर्इंग वाहनावरील कर्मचारीºयांनी विशेष शाखेच्या साहेबराव कडाळे नामक पोलीस कर्मचाºयासह मनपाच्या रामकुंड वाहनतळावर असलेल्या दुचाकी उचलून नेण्याचे धाडस केले. विशेष शाखेच्या त्या कर्मचाºयाने पोलीस असल्याचे सांगून बंदोबस्त कामासाठी आल्याचे सांगूनही संबंधित वाहतूक शाखेच्या पोलिसाने दुचाकी सोडली नाही.
गत अनेक दिवसांपासून वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडून ‘नो पार्किंग’ तसेच वाहतुकीला अडथळा ठरल्याच्या कारणावरून केवळ रामकुंडावर देवदर्शन विशेषत: धार्मिक विधी व दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांचीच वाहने उचलून नेण्याचे काम करून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाहनचालक अर्धनग्नावस्थेत टोर्इंग वाहनामागे
शुक्रवारी दुपारी वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडील कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी वाहन उचलून नेत असल्याचे समजताच काही नागरिकांनी रामकुंडातून अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर येऊन टोर्इंग वाहनाच्या मागे धाव घेतल्याचे चित्र दिसून आले.