धमकी पत्राविरोधात सायगावला निषेधसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:47 PM2018-10-30T17:47:08+5:302018-10-30T17:47:22+5:30

येवला : माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सायगाव येथे रोकडोबा पारावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सायगावकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हात उंच करून या धमकी पत्राचा निषेध व्यक्त केला.

Protesting against threatening letter to Syigah | धमकी पत्राविरोधात सायगावला निषेधसभा

धमकी पत्राविरोधात सायगावला निषेधसभा

Next

येवला : माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सायगाव येथे रोकडोबा पारावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सायगावकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हात उंच करून या धमकी पत्राचा निषेध व्यक्त केला.
मनुवादी वृत्तीनी भुजबळांना लक्ष करून धमकीपत्रचे षडयंत्र रचले असल्याचा सूर यावेळी भाषणात वक्त्यांनी लावला.
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर यांनी झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच गणपत खैरणार, उपसरपंच दिनेश खैरणार, संजय मिस्तरी, ,चिंधु ढाकणे, बाबा बारे,दत्तू कूळधर, अनंत गाडेकर, बबन उशीर, अशोक कुळधर, श्रीपद भालेराव, दिलीप ढाकणे, नाना उशीर, विठ्ठल दारु ंटे, देविदास जानराव, अरु ण जानराव, विठ्ठल देवड आदी उपस्थीत होते..

Web Title: Protesting against threatening letter to Syigah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.