किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:23 AM2021-05-27T01:23:44+5:302021-05-27T01:24:07+5:30

शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Protests against the Center in the district on behalf of Kisan Sabha | किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

Next
ठळक मुद्देनिषेधाच्या घोषणा : जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले काळे झेंडे

नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करीत असून, ठाण मांडून बसलेले आहेत. त्यास सहा महिने पूर्ण होत असून शेतकरीविरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, लेबर कोड कायदा रद्द करावा, मोफत लस आणि उपचार देण्यात यावा, चार महिने मोफत धान्य देण्यात यावे, बेरोजगारांना ६००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रद्द करण्यात यावा, राज्य सरकारांना जीएसटीचे पैसे देण्यात यावेत, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी घोषित करावे, रोजगार हमी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रतिदिन देण्यात यावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, ईपीएफ पेन्शनर्सला किमान नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी किसान सभेचे राज्य सचिव, आायटकचे  जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, संघटक विजय दराडे,  सुखदेव केदारे,  दत्तात्रय गांगुर्डे, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सुनीता कुलकर्णी, किरण डावखर, मकसूद अन्सारी, मीना आढाव, देवीदास भोपाळे, सुभाष काकड, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश नाईक, नरेंद्र कांबळे, चित्रा जगताप, हसीना शेख आदी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध
केंद्र सरकारलादेखील सात वर्षं पूर्ण होत असून, गेल्या सात वर्षांच्या कालावधीत केंद्राने शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरण अवलंबिले असून  शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ निषेध दिन पाळण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातात काळे झेंडे फडकावत निषेध नोंदविला. अनेकांनी आपल्या घरांवर तसेच वाहनांवरही काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा विरोध दर्शविला. 

Web Title: Protests against the Center in the district on behalf of Kisan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.