छिंदमच्या विरोधात राष्टÑवादीचे नाशिक कारागृहाबाहेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:18 PM2018-02-20T15:18:48+5:302018-02-20T15:25:49+5:30
शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावरण तंग होवून छिंदम यांच्या घरावर दगडफेक
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अनुद्गार काढणारे अहमदनगर महापालिकेचे भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना नाशिकच्या पुण्यभुमीतून हाकला अशी मागणी करीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीने मंगळवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर जोरदार निदर्शने करून कारागृह अधिक्षकांना निवेदन सादर केले. छिंदम यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अहमदनगर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने छिंदम सध्या नाशिकरोड कारागृहात आहे.
शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावरण तंग होवून छिंदम यांच्या घरावर दगडफेक तसेच कार्यालयाची मोडतोड करण्यात येवून त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. न्यायालयीन कोठडीत नगरच्या तुरूंगात डांबलेल्या छिंदम यांच्यावर तेथील कैद्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या जिवीताला असलेला धोका पाहता नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले आहे. छिंदम याने समस्त शिवपे्रमींच्या भावना दुखावल्याने त्यांना नाशिकच्या पुण्यभुमीत राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी करीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेरच निदर्शने आंदोलन केले. यावेळी छिंदम व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून त्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी पक्षाच्यावतीने कारागृह अधिक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, त्यांनी राज्य सरकारकडे भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.